Maharashtra

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारीणीची चांदूर रेल्वे येथे बैठक संपन्न.

Spread the love

चांदुर रेल्वे|समर्थ भारत मराठी :

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन  ४ जानेवारी २०२४ गुरुवार ला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येथे आयोजित केले असून या संदर्भात केंद्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक चांदूर रेल्वे येथील हॉटेल गोविंदवाडा येथे नुकतीच पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय सदस्य अंबादास सिनकर, केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर, प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, प्रदेश सदस्य उत्तम गावंडे, महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन ढोके, जिल्हा कार्यालय प्रमुख निलेश राजस, अमरावती तालुका सचिव रामचंद्र मुंदाने आदींची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी जळगाव (जामोद) येथील देवाशिष लॉन्स येथे घेण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. यानंतर या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करून जबाबादाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी चर्चा झाली.

यावेळी मनोहर सुने, युसुफ खान, राजेंद्र भुरे, सुरेश सवळे, कैलासबापू देशमुख, प्रा. रवींद्र मेंढे आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष मनीष खुणे, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष शहजाद खान, उपाध्यक्ष राहुल देशमुख, सचिव राजीव शिवणकर, सदस्य अमोल गवळी, इरफान पठाण, धिरज नेवारे, विनय गोटफोडे, प्रशांत सिसोदीया, संजय डगवार व इतरांची उपस्थिती होती.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!