Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

दीन्यू ईरा हायस्कूलचे शास‌कीय चित्रकला परीक्षेत यश. 

Spread the love

जळगांव जामोद, दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेला एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रक‌ला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये दि न्यू ईरा हायस्कूलच्या विद्याथ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले या परीक्षेत एकुण १८ विद्यार्थी बसले होते एलिमेंटरीचा निकाल १०० टक्के लागला असून इंटरमिजीएट निकालसुध्दा १०० टक्के लागला आहे.त्यापैकी अ श्रेणी मध्ये १८ विद्यार्थी तर व श्रेणी मध्ये २९ विध्यार्थ्यांनी यश संपाद‌न केले.

अ श्रेणीमध्ये शार्दूल अनिल भगत, उत्कर्षा प्रितमसिंह ठाकुर, भक्ती श्रीराम निमकर्डे, श्रुती सखाराम ‌डावर, जान्हवी सुनिल कपले, मैथिली संजय दंडे, रेणु तूकाराम रंदाळे, रेणुका श्रीकृष्ण माटे, श्रावणी राजेश मिसाळ, उन्नती विनोद पिंजरकर, आचल प्रविण शिरेकार, धनश्री विठ्ठल अवचार, गौरी प्रमोद जाधव, मानसी धनंजय शिंबरे, पुनम अनंता ताडे, राधिका रामदास तुरुक, राशी निलेश भोपळे, वैष्णवी राजकुमार बोदडे यांचा समावेश आहे.

विध्यार्थ्यांना यशाचे श्रेय प्राचार्य अविनाश कुळकर्णी, उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकार तायडे व कलाशिक्षक रविंद्र गावंडे यांना दिले आहे.

error: Content is protected !!