Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जळगाव जामोदच्या “जिनियस अकॅडमी” चे विध्यार्थी चमकले.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल अमरावतीने दिनांक ९ डिसेंबर रोजी ऑनलाइन व १० डिसेंबर रोजी ऑफलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा आयोजित केल्या होत्या.स्पर्धेला विदर्भातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत जळगाव जामोदच्या जीनियस अबॅकस आणि वैदिक मॅथ क्लासच्या ऋतुंभरा रितेश आव्हेकर यांच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यात ०४ विद्यार्थी ऑनलाईन तर २१ विद्यार्थी ऑफलाइन या परीक्षेत सहभागी झाले होते.

गुंजन काळे,अंश गारमोडे,आयुष भोंगड, हितांशू बोरसे,प्रांजल गव्हाड,रुद्र देशमुख,संगीता देशमुख,सार्थक डिक्कर,स्वरा रोठे, हर्षल गई, तुषार पारस्कर यांनी फर्स्ट रँक तर गौरव भालतडक,अनुज वाघ,कृष्णालि पारस्कर,संस्कृती बाळापुरे,त्रिषा इंगळे,यश राजपूत ,ईश्वर पारस्कर यांनी सेकंड रँक मध्ये तर अखिलेश काळे,अनुश्री तायडे,पृथ्वीराज रोठे, वैदही देशमुख,अन्वी बुरघाटे,श्रावणी रोठे,श्रेया रोठे या विद्यार्थ्यांनी थर्ड रँक मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. श्रावणी रोठे,श्रेया रोठे,या दोन विद्यार्थ्यांनी वैदिक मॅथ स्पर्धेत तृतीय बक्षीस संपादित केले.

स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बिर्ला मुख्य कार्यालय मुंबई कडून विशेष अतिथी म्हणून पुष्पा चंदेल (जनरल मॅनेजर अकॅडमिक्स ) रूची शहा (मॅनेजर अकॅडमी अँड ट्रेनिंग),सुधीर वाकोडे (अध्यक्ष,श्रीमंतयोगी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट )व उपाध्यक्ष आरती आशिष भुंगाडे, प्राचार्य माला पांडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारोह पार पडला.

error: Content is protected !!