★सभासदांमध्ये नाराजीचा सूर.
★२० डिसेंम्बर ला होईल चित्र स्पष्ट.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगांव जामोद परिसरात नावलौकिक प्राप्त केलेल्या श्री.ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सभासदांमध्ये नाराजीचा सूर असल्याने यंदा संचालक मंडळाची निवडणूक होण्याचा अंदाज जाणकार वर्तवित आहेत.

सन१९९२ मध्ये ६७० सभासद,९४ हजार भागभांडवलासह जळगाव जामोद येथे श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पत संस्थेची स्थापन करण्यात आली.एकवेळ चा अपवाद वगळता स्थापनेपासून आजतागायत संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली नाही. यावेळीही निवडणूक अविरोध करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा सुरू असला तरी त्याला कितपत यश येते हे दि.२० डिसेंम्बर रोजी नामांकान अर्ज परत घेण्याचा शेवटच्या दिवशी समजेल.
संचालक मंडळामध्ये विशिष्ट लोकांची मक्तेदारी, सामान्य सभासदास प्रतिनिधित्व मिळत नसल्याची ओरड सभासदांची आहे. श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीत असून परिसरातील नागरिकांचा पतसंस्थेवर विश्वास आहे.सन २०२३ मध्ये संस्थेची सभासद संख्या २२०० आहे.यावेळेस संस्थेच्या वतीने संचालक मंडळामध्ये बदल अपेक्षित असतांना विशेष काही बदल करण्यात न आल्याची चर्चा सभासदांची आहे त्यामुळे संस्थेची निवडणूक अटळ असल्याचे जाणकार बोलत आहेत.
संस्थेची सन२०२३ ते २०२८ या पंचवार्षिक साठी संचालक मंडळ निवडणूक प्रक्रीया दि.२८नोव्हेंबर रोजी सुरु झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे अखेरचे दि. ०४ डिसेंम्बर पर्यंत एकूण ३२ नामांकन दाखल झाले होते.तर दि ०५ डिसेंम्बर रोजी नामनिर्देशन पत्राच्या झालेल्या छानणीत एक अर्ज बाद झाला असून ३१ अर्ज मंजूर झाले आहेत.
आता एकुण ११ संचालकांकरीता ३१ नामांकन अर्ज आहेत.दि.२० डिसेंम्बरअर्ज परत घेण्याची अखेरची तारीख आहे.यादिवशी संचालक मंडळास नाराज सभासदांची मनधरणी करण्यात यश न आल्यास दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.
संस्थेच्या ११ संचालकामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून सहा सदस्य,अनु. जाती/ जमातीती मधून एक सदस्य , महिला मतदारसंघातून दोन, इतर मागावर्गीय मधून एक सदस्य, विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा वि. विशेष मागास प्रवर्ग मधून एक असे एकूण – ११ सदस्यकरिता निवडणूक होत आहे. संस्थेच्या निवडणुकीत १९०३ पात्र सभासद आपला मतदानाचा हक्क बजावतील.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश कृपलानी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जळगाव जामोद हे काम पाहत आहेत.
Add Comment