जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासह महसूल कर्मचारी संघटना यांनी दि.१४ डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी देखील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.२४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनास निवेदन देण्यात आले होते. त्यावर शासनाने आज पर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सर्व महसुल कर्मचारी संघटना,तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजनेबाबत कोणते ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम राहू असे यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पि.के गवई, उपाध्यक्ष पि.आर .राजपूत, सचिव एस.जे.भोगे, एस.टी.वडोदे,एस.आर.भारसाकडे,कु.आर.बी.सातव,डि.बी.चव्हाण, एन.एस.गोरे,श्रीमती ए.आर.भोजने यांच्यासह बहुसंख्य महसूल कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!