जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा संपन्न.

Spread the love

जळगाव जामोद|समर्थ भारत मराठी : जळगांव जामोद तहसील कार्यालयात नुकतीच जळगाव जामोद येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा संपन्न झाली.

बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने यांना संदर्भीय प्रशासन परिपत्रकान्वये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम ३१ अंतर्गत परवाना नोंदणी घेणे बंधनकारक आहे व त्याबाबत जिल्हास्तरीय ॲडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड हेल्दी डाइट दि.२८/७/२०२३च्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय आढावा घेतला असून अध्यापर्यंत कोणत्याच तालुक्यांच्या रास्त भाव दुकानांनी संपूर्ण नोंदणी न केल्याने रेशन दुकानाचा परवाना अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत परवाना हा पुढील पंधरा दिवसांमध्ये नोंदणी करून घेणेबाबत व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणेबाबत कळविले होते. त्याअनुषंगाने दि.१३ डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन मार्फत आढावा बैठक घेऊन जळगाव तालुक्यातील रेशन दुकानदारांना परवाने नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आणि काही लोकांचे परवाने ऑनलाइन करून तहसीलदार शितल सोलाट व औषध व प्रशासन विभागाचे असिस्टंट कमिशनर सचिन केदारे व पुरवठा निरीक्षक भरत किटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ह्यावेळेस पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक पी व्ही आठवले,अव्वल कारकून एन वाय शेगोकार व कार्ड लिपिक बी बी बग्गन तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!