political party Politics जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद नगरपालिकेत उपाध्यक्षपदी भाजपाचे कैलास पाटील.

Spread the love

स्वीकृत सदस्यपदी सचिन जोशी व ऍड करीम खान यांची निवड.

जळगांव जामोद,दि.१३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

जळगाव जामोद नगरपालिकेत असलेल्या एकूण २२ जागापैकी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा सह एकूण नऊ नगरसेवकाच्या जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ची एक जागा निवडून आल्याने एकूण ११ सदस्यांचे बलाबल भाजपा कडे होतें.त्यामुळे उपाध्यक्ष भाजपाचाच होणार असे आ.डॉ. संजय कुटे यांनी आधीच सांगितले होते.

दि. १३ जानेवारी रोजी उपाध्यक्ष पद व स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया नगपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी कडुन कैलास पाटील यांचा तर शहर विकास आघाडी या गटाकडुन शे गुलाब शे भिकारी यांचा तर काँग्रेस कडुन फरजानाबी सैयद अफरोज यांचा असे तीन अर्ज प्राप्त झाले होते.अंतिम छानणी नंतर तिन्ही अर्ज पात्र ठरले आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये कैलास पाटील यांना सर्वाधिक ११ मते मिळाली तर शे गुलाब  यांना ६ मते तर काँग्रेस उमेदवार यांना ५ मते मिळाली. मतमोजणी नंतर पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष गणेश दांडगे यांनी कैलास पाटील यांना विजयी घोषित केले.यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून नगरध्यक्ष गणेश दांडगे हे होते तर त्यांना सहायक म्हणून डॉ सुरज जाधव मुख्याधिकारी न प जळगाव जामोद व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले.

कैलास पाटील यांची उपाध्यक्ष पदी निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी बँड वाजवून,फटाके फोडून व पेढे वाटून मोठा जल्लोष केला. या प्रसंगी महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमोद कुटे,अशोक नानकदे,रामा इंगळे,उमेश येऊल,डॉ नंदू तायडे,शाकीर खान,राम सिंधीकर,बाळू चव्हाण यांचे सह  कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेल्या प्रक्रियेत सर्वाधिक मोठा गट भाजपा असल्याने त्यांचे वतीने सचिन श्रीधर जोशी यांची निवड करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी (शप),एमआयएम,समाजवादी पार्टी, आणि अपक्ष असा शहर विकास आघाडी यांचा गट मोठा असल्याने ऍड करीम खान यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

error: Content is protected !!