जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

समाधान बगाडे यांना सेवापुर्ती निमित्त भावपूर्ण निरोप.

Spread the love

जळगाव जामोद,दि.३१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) :

सातपुडा शिक्षण संस्थेचे सुपरीचीत व्यक्तिमत्व असलेले कर्मचारी समाधान जगदेवराव बगाडे यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व निरोप समारंभ सोहळा दि.३१  रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब इंगळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे गौरवस्थानी समाधान बगाडे व त्यांच्या पत्नी सौ मनीषा बगाडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात पीक संरक्षण विषयाचे तज्ञ अनिल गाभने यांनी समाधान बगाडे यांच्या सोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला व केलेले कार्य संस्थेसाठी मागील तीस वर्षापासून प्रेरणादायक असल्याचे मनोगत व्यक्त केले. 

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख  विकास जाधव  यांनी समाधान  बगाडे यांच्यासोबत कार्यालयीन कामकाजाचा अनुभव व्यक्त केला.तर भाऊसाहेब इंगळे यांनी सामाजिक कार्याबद्दल अनेक अनुभव सांगितले. सत्कारमूर्ती समाधान जगदेव बगाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थितांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उमाळे विषय विशेषज्ञ यांनी केले.कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र चे सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी सपत्नीक उपस्थित होते.

error: Content is protected !!