जळगाव जामोद,दि.१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
नगरपरिषदेची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस सज्ज झाले असून ३० नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर आनंद महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहरातुन पथसंचलन केले.
जळगांव नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडत असुन त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे.सभा,कार्नर सभा,रँली अशा विविध प्रकारे प्रचार केला जात आहे. निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.यावेळी स्थानिक दुर्गा चौक येथे मॉब लिंचिंगसह निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी शहरातील दुर्गा चौक येथे दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
पथसंचलन पोलीस स्टेशन मधून स्थानिक दुर्गा चौक, चौभारा चौक,मानाजी चौक, चावडी मार्गे परत दुर्गा चौक येथे प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन,पोलीस निरीक्षक नितीन पाटील, एपीआय नागेश मोहोड, पीएसआय नारायण सरकटे, गोपनीय विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे,यांचे सह पोलीस स्टेशनचे सर्व पीएसआय,पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड, एस आर पी एफ चे जवान उपस्थित होते.













