त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान.
जळगाव जामोद,दि.१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आसलगाव येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर दत्त ग्राम पळशी सुपो येथे सुरू असून सहाव्या दिवशी सन्मान लेखणीचा जागर कर्तुत्वाचा हा पत्रकारांच्या सन्मानार्थ कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रा. निळकंठ राठोड. तर पत्रकार अनिल भगत, सागर झनके,गोपाल अवचार, संजय दांडगे, राहुल निर्मळ, किशोर दाताळकर, गजानन सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकशाहीचा खरा आधारस्तंभ असलेल्या व आपले लेखणीच्या माध्यमातून समाज जनजागृतीचे व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांच्या कामगिरीबद्दल श्रमसंस्कार शिबिरामध्ये पत्रकार अनिल भगत, संजय दांडगे, गोपाल अवचार, सागर झनके, किशोर दाताळकर,राहुल निर्मळ, गजानन सोनटक्के यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक निळकंठ राठोड यांनी शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी वापरण्यात यावे तसेच पत्रकार हे समाजाला सदैव आरसा दाखविण्याची काम करतात, अन्यायाला वाचा फोडून गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवतात अशा सर्व पत्रकारांचा सन्मान होणे हे आम्ही भाग्य समजतो असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विद्या काटले, प्रा. सुप्रिया इंगळे, प्रा. योगेश वारुकार,प्रा.माहेश्वरी वाघमारे, प्राध्यापक रवींद्र निमकर्डे यांचे सह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शरद गावंडे यांच्यासह श्रमसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थी व सुपो पळशी गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.













