जळगांव जामोद,दि.१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य चे संस्थापक ॲड. सलिम पटेल व सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाने संविधान दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख होत्या. कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. इंगळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच प्रत्येक नागरिकाने जपावयाच्या लोकशाही मूल्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास अतिथी म्हणून माजी सैनिक रामेश्वर रणित लाभले होते.त्यांनी भारतीय सैन्य सेवेतून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाचे संरक्षण करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
संविधान दिन क्विझ स्पर्धेत अब्दुल कादिर अब्दुल जाकीर या विद्यार्थ्याने विजेतेपद मिळवून आपले कौशल्य सादर केले.कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे वाचन सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केले व संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी तर डॉ. डी. आर. सिरसट यांनी मनःपूर्वक आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. नूर मोहम्मद व डॉ. चेतन पलन, डॉ.महेश नेतनस्कर, डॉ. निखिल अग्रवाल, डॉ. बाबाराव सांगळे, प्रा. नितीन असोले, डॉ. प्राजक्ता बाठे, प्रा. मोहम्मद शोएब प्रा. शकील खान, प्रा. जोया आफरीन, प्रा. रिझवान शेख, प्रा. समीर तडवी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.













