जळगांव जामोद,दि.१७(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
कृष्णाई गोशाळा ट्रस्ट जामोद येथे गो पूजनाचा कार्यक्रम आमदार डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पूजन करून संपन्न झाला.वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होते आदी काळापासून वसुबारस कार्यक्रमाला भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना आ.डॉ.संजय कुटे यांनी गायीचे महत्त्व विशद केले व भारतीय संस्कृतीमध्ये गाईला महत्त्वाचे स्थान आहे गाय ही आपली माय आहे तिच्या सानिध्यात मन शांती व आनंद प्राप्ती असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल होते कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,संस्थेचे सचिव प्रा.सचिन हागे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री राजेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह कपिल विभानी,गुणवंतराव कपले प्रदेश सदस्य भारतीय जनता पार्टी,श्वेता पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जळगाव जामोद,प्रिया हागे;मानद पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन, रामा राऊत;माजी सभापती पंचायत समिती जळगाव,गोपाल घाटे,सुरेश अंबडकार, समाधान डाबेराव महादेव दामधर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन हागे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल घाटे यांनी केले
Add Comment