जळगांव जामोद,दि.१२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सामाजिक न्यायच्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम राबवून गावातील प्रत्येक घटक सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन पंचायत समिती कार्यालयामध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी मधून मागासवर्गीय कल्याण १५ टक्के निधी मधून समाज मंदिरासाठी साहित्य वाटप कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी चावरा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच शोभा तुकाराम इंगळे तर उद्घाटन म्हणून आ.डॉ.संजय कुटे हे होते तर वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष रमेश नाईक, अरुण पारवे,रतन नाईक,देवा दामोधर, सुनील बोदडे,स्वप्नील गवई,रवी जाधव यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कडून समाज कल्याण चा पंधरा टक्के राखीव निधी हा मागासवर्गीय व्यक्तींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे परंतु बराच अनुशेष बाकी असल्याने ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात साहित्य पुरवणे व त्याचा वापर अभ्यासिकेसाठी करणे यासाठी आ. डॉ संजय कुटे यांचे संकल्पनेतून व त्याचे नियोजन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे संमतीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार पंचायत समितीच्या प्रांगणात आ.डॉ संजय कुटे यांचे हस्ते व सर्व सरपंच यांचे उपस्थितीत वाटप करण्यात आले.
वाटप होत असलेल्या साहित्याचे रूपांतर अल्पावधीतच अभ्यासिकेमध्ये करण्याचे आश्वासन माजी मंत्री डॉ संजय कुटे यांनी दिले.गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे यांनी ग्रामनिधी मधील योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजना सूर्यघर योजना बाबत सविस्तर माहिती यावेळी देऊन २४,२५,२६ मधील घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केले. समाज मंदिरासाठी वाटप होत असलेल्या साहित्याचा सदुपयोग ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधितांकडून करून घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर यांनी केले तर नियोजन सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे यांनी केले.
Add Comment