Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

दीपक उमाळे यांना राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर.

Spread the love

जळगाव जामोद दि.१९(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) :

तालुक्यातील चारबन येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दीपक उमाळे यांची राज्य शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी निवड झाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. राज्य निवड समितीच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दोन्ही शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली. यंदा राज्यातील १०९ शिक्षकांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्राथमिकमध्ये उमाळे यांचा समावेश आहे. दीपक उमाळे हे गेल्या ११ वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असून त्यांनी आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक पद्धती विकसित केल्या आहेत.आदिवासी समाजाच्या चालीरीतींचा त्यांनी अभ्यास करून शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.

या कामगिरीच्या बळावर दीपक उमाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार आहे. आदिवासी विद्यार्त्यांच्या भाषेची अडचण सोडविण्यासाठी त्यानी द्वि भाषा शब्दकोश निर्मिती केली असून स्वतः विद्यार्त्यांची बोलीभाषा अवगत केली हे त्यांचे विशेष कार्य आहे.

error: Content is protected !!