सूनगावच्या शेतकऱ्यांची मागणी : तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन.
जळगांव जामोद,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
सततच्या पावसामुळे संत्रा बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पाहणी करून मदत देण्याची मागणी सुनगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील सूनगाव, जामोद परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी फार मोठ्यात आहेत.ह्या परिसरात संत्रा पिकाचा पेरा फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु यावर्षी आलेल्या रोगामुळे आणि सततच्या पावसामुळे मृग बहारामधील संत्र्याच्या झाडावरील फुले व फळे यांच्यावर अज्ञात रोग आल्याने गळून पडली आहेत.त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.परंतु संत्रा झाडांची व फळगळ प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.शेतकऱ्यांच्या संत्रा फळगळ झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून यंदाच्या मृग बहाराचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून योग्य प्रकारे मदत मिळवून द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांना सूनगाव येथील संत्रा बागातदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
Add Comment