Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत द्या.

Spread the love

भा. रा.कॉ.(ओ.बी. सी विभागाची)मागणी : तहसीलदारांना निवेदन.

जळगांव जामोद,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे संत्रा फळगळ, कापूस, सोयाबीन,भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसान झाल्यामुळे मदतीची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात नमूद आहे की,तालुक्यातील जामोद, सुनगाव, रसलपूर, निमखेडी, कुंवरदेव, उसरा बु, उसरा खु, चालठाणा खु, चालठाणा बु, सोनबर्डी, कहूपट्टा, वावडी हरदो,गोराळा,कौलखेड, तरोडा,खेल लोण,खेलशिवापूर, खेल वर्गे,खेल माळी,खेल पारस,वनुर,सजनपुरी,राजुरा बु, राजुरा खु, महमदपुर,ततारपुर,खामखेड,पिंपळगाव,
आसलगाव,खेर्डा,वडशिंगी,भेंडवड व इतर गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

सततचा पाऊस, अतिवृष्टी, किड व विविध रोगांमुळे संत्रा फळगळ,कापूस,सोयाबीन, भाजीपाला व इतर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.केळी चे दर १८०० रुपये प्रती क्विंटल वरून ५०० रुपये प्रती क्विं. पर्यंत कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानाकरिता केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती क्विंटल नुकसान भरपाई द्यावी.शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत न मिळाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडी चे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी पूर्वी सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येइल.

…..जिल्हा कार्याध्यक्ष,(ओ. बी.सी विभाग भा. रा.कॉ.)समाधान दामधर.

error: Content is protected !!