जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

विदर्भ महसूल सेवक संघटनेचे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन.

Spread the love

जळगाव जामोद,दि.१२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

महसूल सेवक (कोतवाल) महसूल विभागाचा कणा असुन महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो.महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे,उपयोजना शासन स्तरापासून ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटका पर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचविण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हा अधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते.महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे,कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियान मोहिमांच समन्वय, आपत्ती टंचाई,जनगणना,निवडणूक,राज्य शिष्टाचार,विविध जात प्रमाणपत्र देणे अशा अनेक बिगर महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजेची निगडित असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.

क्षेत्रीय स्तरावर तलाठी साजा तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असतो आणि शासकीय सेवा पूर्ण जबाबदारीने पार पडत असतो.परंतु शासनाने अद्याप महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागतो.

महसूल सेवक कोतवाल पदाची महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेऊन महसूल सेवक कोतवाल यांना इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा याकरिता स्थानिक तहसील कार्यालया समोर विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा जळगाव जामोद च्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष मुक्तार शहा, उपाध्यक्ष एस. जी डावर, सचिव ए.आर वाघमारे, कोतवाल वाय.ए.गिरी आर्यन अडकणे,पी,एन आगरकर ,यु.बी पिसे,हेलोडे, वाघमारे, खारोडे,सचिन कपले धरणे आंदोलनास उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!