जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

प्रस्तवित जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर.आ.डॉ.संजय कुटेचे प्रयत्न : वकील संघाने केला सत्कार.

Spread the love

जळगांव जामोद,दि.१२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

जळगांव जामोद येथील प्रस्तावित जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोर्ट हॉल बांधकामासाठी मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी पाठपुरावा करत १,१६,९२,४४३ रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल नुकताच त्यांचा वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जळगाव जामोद येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन होण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. सीसीबी-११२५/प्र.क्र.६६/का-१३ दि.९/९/२०२५ नुसार येथील न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल बांधण्यासाठी १,१६,९२,४४३ ₹ अंदाजीत खर्चाच्या कामास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सदर बाबीचा पाठपुराठा करण्यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी कॅबीनेट मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे जळगाव जामोद वकील संघाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणुन वकील संघाचे अध्यक्ष ऍड.मोहम्मद इरफान जमादार तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी ऍड. बावने यांनी आ. डॉ.संजय कुटे यांच्यासाठी एक कविता सादर केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना ऍड. दत्तात्रय खेर्डेकर कार्यकारी अध्यक्ष वकील संघ जळगाव जामोद यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड. निशा वानखडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड स्वप्निल राजपूत यांनी केले.

error: Content is protected !!