व्यायामाला जीवनाचा अविभाज्य अंग बनवा…डॉ. अपर्णा कुटे.
जळगांव जामोद,दि.२१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदे च्या वतीने दि.२१ रोजी “स्वच्छता पंधरवडा” अंतर्गत स्वच्छोत्सव २०२५ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “एक धाव स्वच्छतेसाठी” हा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये महिला व पुरुष गटातील शेकडो स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
महिलांसाठी ३ किलोमीटर व पुरुषांसाठी ५ किलोमीटर असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.महिला व पुरुष गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना मतदारसंघाचे आ. डॉ संजय कुटे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोख पारितोषिके देण्यात आली.यामध्ये पुरुष गटात पहिले पारितोषिक विनोद वसतकार ₹११,००१/-,दुसरे पारितोषिक रामलाल चोंगळ ₹७००१/- ,तिसरे पारितोषिक प्रकाश वास्कले ₹५००१/- तर महिला गटात पहिले पारितोषिक प्रणाली शेगोकार ₹११,००१/-,दुसरे पारितोषिक प्रांजली मोरे ₹७००१/-
तिसरे पारितोषिक रेणुका वाघ ₹५००१/- चे मानकरी ठरले.
पारितोषिक वितरण सोहळा डॉ.अपर्णा कुटे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मंचावर डॉ.अपर्णा कुटे,लता तायडे,चंदा पुंडे,सविता नानकदे व मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव तसेच मान्यवर उपस्थित होते.नगरपरिषद मार्फत स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमास नागरिक,युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल इंगळे यांनी केले. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व शाळा- महाविद्यालयांचे क्रीडाशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉनच्या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला.
Add Comment