Front Maharashtra political party जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

आ.डॉ. संजय कुटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.

Spread the love

जळगांव जामोद,दि.११(प्रतिनिधी):

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कामगारमंत्री आ.डॉ.संजय कुटे यांचा वाढदिवस दि.९ मार्च रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

सलग पाचव्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी २०२९ पर्यंत विकसित मतदार संघाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात आयुर्वेदिक महाविद्यालय आणि महत्त्वाकांक्षी अशा इथेनॉल प्रकल्पाची पायाभरणी केली आहे.हे प्रकल्प याच वर्षीपासून सुरू होणार असून येत्या शैक्षणिक क्षेत्रात आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये १०० जागांची मंजुरात मिळाली आहे.१४० गाव पाणीपुरवठा योजना,रस्ते,चौकांचे सुशोभीकरण,शासकीय कार्यालयांचे नूतनीकरण सोबतच गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी आ.डॉ. संजय कुटे सदैव अग्रेसर आहेत.अशा या अष्टपैलू व सर्वसामान्य नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ९ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागले होती.

सुरवातीला आ.डॉ.कुटे यांनी आपल्या मातोश्री चे आशीर्वाद घेतले.मतदार संघातील मोतीबिंदू च्या उपचारासाठी जमलेल्या रुग्णा मध्ये आईला सोबत घेऊन कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी रुग्णांना स्व.श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशन च्या वतीने फराळ देऊन त्यांची तपासणी करून ११२ रुग्णांना खाजगी वाहनाने शस्त्रक्रियेसाठी शेगावं येथे रवाना करण्यात आले.तर रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन आ.डॉ.संजय कुटे यांचा ५७ वाढदिवस साजरा केला.अकोला येथील हेडगेवार रक्तपेढी चे डॉ. समीर देशमुख आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले होते.तर सायंकाळी जळगाव जामोद आ.डॉ. संजय कुटे यांच्या लाडूतुलेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील श्रीसंत रुपलाल महाराज नगरपरिषद शाळा,श्री प्रगटेश्वर नगरपरिषद प्राथमिक शाळा,श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळा,नगरपरिषद कन्याशाळा, महात्मा फुले कन्या शाळा अशा पाच शाळांमधील जवळपास ८२० विद्यार्थ्यांना पाणी बॉटल चे वाटपही वाढदिवसानिमित्य करण्यात आले.वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भजन संध्येचे  आयोजन पी.ए. मॉल संचालक प्रमोद भंसाली यांच्या वतीने करण्यात आले होते.  

वाढदिवसानिमित्त आयोजित  तालुक्यातील विविध कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी नगरसेवक निलेश शर्मा,भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील, भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य रवी पाचपोर,भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील,पंकज कड,अक्षय देशमुख, ऍड. दिलीप खोद्रे,पंकज देशमुख,बाळू कुटे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!