Maharashtra crimes जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

वीज बिलाची वसुली करण्यास गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण.

Spread the love

जळगाव जामोद,दि.१३(प्रतिनिधी):

शहरातील कुरेशी मोहल्ल्यात थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी आपल्या दोन सहकार्या सोबत गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण झाल्याची घटना दिनांक १२ मार्च रोजी ११:३० च्या दरम्यान घडली.याविषयीची तक्रार सहाय्यक अभियंत्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. 

शहरात वास्तव्यास असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे हे थकीत वीज बिलाची वसुली करीत असताना शहरातीलच कुरेशी मोहल्यामध्ये शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यात आली.किशोर होणे हे त्यांचे सहकारी संतोष धर्मे,प्रवीण राऊत व खलील खान, बिलन खान यांच्यासोबत कुरेशी मोहल्ल्यात दिनांक १२ मार्च रोजी थकीत बिलाची वसुली करित होते.यावेळी आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याने कुरेशी मोहल्ल्यामध्ये येऊन शिवीगाळ करत किशोर होणे यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.किशोर होणे यांच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याच्याविरुद्ध जळगाव पोस्टेला अप क्र.१३८/२०२५ कलम १३२,३२४(२),३५२,३५१(३) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक अभियंता असलेले किशोर होणे यांना मारहाण झाल्याचे समजताच महावितरण जळगाव जामोद अधिकारी चौभाररावाला यांच्यासह महावितरण चे तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी व  पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी केली होती व जोपर्यंत आरोपी वर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका घेतली होती.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास घट्टे करीत आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!