Maharashtra crimes जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

बोलेरो वाहनातील १५ लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त. 

Spread the love

जळगाव जामोद,दि.५ (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): 

भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने एक व्यक्तीला कट मारल्याने मानेगाव फाटा येथे उभ्या असलेल्या वाहनातून पोलिसांनी सुमारे १५ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना दि.२ रोजी घडली.या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मानेगाव फाटा येथे सचिन सुधाकर अवचार यांना एका मालवाहू वाहनाने कट मारल्याने  जखमी केल्याचे पोलीस स्टेशनच्या दूरध्वनीवर फोन करण्यात आला. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी हे घटनास्थळी शासकीय वाहनाने रवाना झाले.

घटनास्थळी उभा असलेल्या बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एमएच ४८ ए.वाय ३४२१ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने  प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यामध्ये ३० हजार किमतीचे सुप्रीम डेली सीएस पानपराग पान मसाला व ४०हजार ८०० रु. किमतीचा प्रीमियम पान पराग मसाला, २१ हजार ६०० रुपये किमतीचा पान पराग एक्स्ट्रा प्लस पान मसाला,२४ रुपये किमतीचे एक्सपी पाऊच,१ लाख ८८ हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला,१२ हजार किमतीचे सुगंधी तंबाखू ,४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला, ४८ हजार ४०० रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू ,७ लाख ७७ हजार ९२० रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला, ८८ हजार किमतीचे सुगंधी तंबाखू व ४ लाख रुपये किमतीचे जुने वापरते महिंद्रा पिकअप कंपनीचे मालवाहू वाहन असा एकूण २० लाख ४४ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रीराम विष्णू भोबे वय. २२ राहणार अलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहेत.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!