आसलगाव : आ.डॉ.संजय कुटे यांनी घेतला सहभाग.
जळगाव जामोद, दि.२ (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा च्या वतीने दि. २ रोजी सकाळी आठ वाजता आसलगाव ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत परिसरातील आसलगाव,तामगाव ,(संग्रामपूर) शेगाव, खामगाव व तांदुळवाडी (शेंबा) इत्यादी गावातील सुमारे ४०० “श्री” सदस्यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबविली.जळगांव जामोद मतदार संघाचे आ. डॉ. संजय कुटे,गटविकास अधिकारी संदीप मोरे,ग्रामपंचायत सरपंच विष्णू इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादीं मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.
प्रदूषण, दुषीत पाणी ,दूषित हवा यामुळे आपल्या आरोग्य धोक्यात येते,देशाचे नागरिक म्हणून यात सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला.
स्वच्छता अभियानात आसलगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालय ते बाजार गल्ली,बस स्टॉप ते जिल्हा परिषद हायस्कूल रोड,धान्य मार्केट आसलगाव ते जळगाव जामोद रस्ता,ढोकणे लेआउट ते टाकळी रोड चावडी पर्यंत ओला आणि सुका कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षरोपण व संवर्धन ,रस्ता दुरुस्ती, प्रौढ साक्षरता शिक्षण, विहिरीतील गाळ उपसणे पाणपोई, शालेय साहित्य वाटप प्रतिष्ठानच्या वतीने असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबवले जातात.
Add Comment