जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद मतदारसंघ महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल…..आ.डॉ. संजय कुटे 

Spread the love

जळगाव जामोद,दि.२३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

मागील चार टर्म मध्ये जळगाव जामोद मतदारसंघात अमुलाग्र बदल झाला आहे.याकाळात पायाभूत सुविधा निर्माण करून मतदारसंघाची बांधणी केली आहे.२०२४ ते २०२९ या पाच वर्षात जळगाव जामोद मतदारसंघ महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल असे प्रतिपादन पोलीस प्रशासकीय इमारत बांधकामाच्या  भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. डॉ. संजय कुटे यांनी केले.

पोलीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा दि २३ रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  आ.डॉ. संजय कुटे  तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व्यासपीठावर उपस्थित होते. 

पुढे बोलतांना डॉ. कुटे म्हणाले की,जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या इमारतीने शतकपूर्ती केली.बदलत्या परिस्थितीमुळे  इमारतीत बदल करणे आवश्यक होते. कर्मचारी समाधानी असला तरच तो प्रभावीपणे काम करू शकतो त्याकरता भौतिक  सुविधा योग्य असणे आवश्यक आहे. त्याकरिता पोलीस स्टेशनची दोन मजली भव्य इमारत महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात येत आहे.इमारत बांधण्याकरिता जवळपास पावणेचार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे . तसेच पुढील एक-दोन महिन्यात कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाकरिता जवळपास दहा कोटींच्या सदनिका उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अनिल भगत यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार,गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!