Maharashtra crimes • जळगांव जामोद • बुलढाणा जिल्हा

व्यवसायिकाची रोख रकमेची पिशवी चोरट्यांनी केली लंपास.

Spread the love

जळगांव जामोद तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ.

जळगांव जामोद,दि.२४(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

शहरातील दारू व्यवसायिकाच्या दुकानातील रोख रक्कमेची पिशवी अज्ञात आरोपीने पळविल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.सुमारे तीन लाखांच्या रकमेवर चोरट्याने हात साफ केला असून तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार बाबुराव चोपडे हे दि.२१ रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान गोविंद अग्रवाल यांच्या दारू दुकानातील रोख रक्कम अग्रवाल यांच्या घरी घेऊन जात असतांना शहरातील शर्मा हॉस्पिटल जवळ एका अज्ञात इसमाने पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला.बाबुराव चोपडे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गोविंद अग्रवाल यांच्या दारू दुकानातील ०३ लाख ३४ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत.

error: Content is protected !!