जळगांव जामोद • बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद मतदारसंघात घरकुल योजनेच्या पाच हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण.

Spread the love

महाआवास अभियान : ९५०० लाभार्थ्यांची घरे मंजूर.

जळगाव जामोद,दि.२२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) :

ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण अंतर्गत महाआवास अभियान सन २०२४-२५ अंतगत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत  एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व प्रथम हप्त्याचे वितरण पंचायत समिती जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता.तालुका स्तर व ग्रामपंचायत स्तरावर हा महाउत्सव साजरा करण्यात आला. मतदार संघात ९५०० घरे मंजुर असून ५००० लाभार्थ्यांना एकाच दिवशी प्रथम हप्ता आ.डॉ संजय कुटे यांच्या सुविध्य पत्नी डॉ.अपर्णा कुटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. 

बालेवाडी पुणे येथे गृहमंत्री भारत सरकार अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. सम्पूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होत आहे व यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवा सोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेल्या चाळीस टापरी व गोमाल १ व गोमाल २ येथील अतिक्रमण धारकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी संदीप मोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामपंचायत चे सर्व सरपंच व ग्राप अधिकारी,सर्व पक्षीय पदाधिकारी,नागरिक, पत्रकारांची उपस्थिती होती. 

error: Content is protected !!