Education • Maharashtra • जळगांव जामोद • बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद च्या संकेतने शिवाजी महाराजांची भूमिका साकारून जिंकली मने.

Spread the love

जळगावजामोद, दि.२२(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी): 

आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वालियर (मध्य प्रदेश) मध्ये प्रथमच विद्यापीठाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये असलेल्या खेर्डा बु गावातील संकेत जयदेव वानखडे या एम एस सी एग्रीकल्चर च्या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्कृष्टपणे सादरीकरण करून विद्यापीठाचे कुलगुरूसह उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. 

मातृ तीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद सारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील एका नवयुवकांनी मध्य प्रदेशात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी उपस्थित महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसह मध्य प्रदेश, केरळ,दिल्ली,उत्तर प्रदेश,हरियाणा,पंजाब,आंध्र प्रदेश व इतर राज्यातील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.

विशेष म्हणजे संकेत च्या पुढाकाराने सर्वप्रथम या विद्यापीठांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचा उत्सव पाहून विद्यापीठाचे कुलगुरू यांनी दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचे आश्वासन दिले. बाहेर देशामधून नेपाळ चीन जपान आणि अमेरिका येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा शिवजयंतीचा आनंद लुटला.

error: Content is protected !!