Maharashtra Maharashtra crimes देऊळगाव राजा बुलढाणा बुलढाणा जिल्हा

अंढेरा शिवारातील अवैध व विनापरवाना १२ कोटींचा लागवड केलेला अफू जप्त. 

Spread the love

स्थानिक गुन्ह शाखेची कारवाई :आरोपीस अटक

बुलढाणा,दि.२२(प्रतिनिधी):

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात शेताच्या मधोमध चहुबाजूंनी असलेल्या मक्याच्या आत अवैधरित्या व विनापरवाना लागवड केलेला सुमारे१२कोटी रुपयांचा अफू अमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने धडाकेबाज कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत १५७२ किलो १०० ग्राम अफू जप्त करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यवनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर “अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.)” कायद्याखाली धडक कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार पोनि.अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

दि.२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. अंढेरा हद्दीत संतोष मधूकर सानप रा.अंढेरा हा त्याचे मालकीच्या शेतामध्ये विनापरवाना व अवैधरित्या अफू या अंमली पदार्थाची लागवड व त्याचे संवर्धन करुन अफू बाळगून आहे. त्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा शिवारातील संतोष सानप याचे मालकीच्या शेतामध्ये सापळा रचून अफू संबंधाने कार्यवाही केली. या कारवाईमध्ये अफू अंमली पदार्थ १५७२ किलो १०० ग्रॅम किं. १२,६०,२८,०००/- रुपये शेतात लागवड केलेली अफू अंमली पदार्थ मिळून आला. आरोपीने त्याचे शेताचे मधोमध १६ गुंठे जागेमध्ये अफूची लागवड करुन संवर्धन केले. लागवड केलेल्या अफूची लोकांना जाणीव होऊ नये म्हणून चारीबाजूंनी मका पिकाची लागवड केली. तसेच अफूची जागा कोणालाही दिसू नये म्हणून त्यावर ग्रीन नेटने आच्छादन केलेले होते.

गुन्ह्यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुध्द पो.स्टे. अंढेरा येथे NDPS ऍक्टचे मॅक्टचे कलम ८(क), १८(क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यात ईतर आरोपिंचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती मनिषा कदम-उप.वि.पो.अ. देऊळगांव राजा करीत आहेत.

ही कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव,बी.वो महामुनी. अ.पो.अ. बुलढाणा, श्रीमती मनिषा कदम उपविपोअ. देऊळगांव राजा यांचे  मार्गदर्शनाखाली पो.नि अशोक एन. लांडे यांचे नेतृत्वात, सपोनि. आशिष रोही, रुपेश शक्करगे, पोउपनि, सचिन कानडे, प्रताप बाजड, सफौ. राजकुमार राजपूत, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोहेकॉ. दिनेश बकाले, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे, सतीश हाताळकर, पोना, विजय वारुळे, युवराज राठोड, गजानन दराडे, विजय पैठणे, पोकों, मंगेश सनगाळे, दिपक वायाळ, भारत जाधव, चापोहेकॉ. शिवानंद मुंढे, समाधान टेकाळे, चापोना, सुरेश भिसे, चापोकॉ. विलास भोसले यांनी केली.

error: Content is protected !!