निमा संघटनेचा उपक्रम.
संग्रामपूर, दि.२० (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पायी जाणाऱ्या गजानन भक्तांना शेगाव अर्बन परिवार, माऊली वैद्यकीय पथक,नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन व होमिओपॅथिक संघटनेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात आली.औषधोपचारासह दाढी व कटिंग तसेच निशुल्क पादत्राणे दुरुस्तीचीही सेवा यावेळी देण्यात आली.
पातुर्डा फाटा येथे शेगाव करीता गजानन महाराजांच्या
प्रगट दिनानिमित्त पायी जाणाऱ्या ग्रामीण भागातील
सोनाळा, टूनकी,बावनबीर, एकलारा, काटेल, पलसोडा,वरवट, संग्रामपूर, जामोद, जळगाव, कळमखेड,पळशी,पातुर्डा,वानखेड, मध्य प्रदेशातून येणाऱ्या भक्ताच्या सेवेसाठी निमा (डॉक्टर संघटना)आणि परिसरातील सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व औषधोपचार दि.२० रोजी पादत्राणे दुरुस्ती, कटिंग दाढी विनामूल्य सेवा पुरविली.
या सेवाकार्यात डॉ.अभिजित देशमुख, डॉ. मंगेश बडेरे, डॉ .अतुल अंबडकर, डॉ .संदिप राखोंडे, डॉ.ज्ञानेश धर्माळ , डॉ. प्राजक्ता धर्माळ, डॉ. शैलेश गांधी. तसेच, तुळजाई मेडिकल जळगाव (जा) चे किशोर वानखेडे, सृष्टि मेडिकल चे दिपक देशमुख, ओंकार मेडिकलचे अंकुश नवलखे आणि साहिल हेअर सलून चे संचालक शाम उंबरकर तसेच पादत्राणे दुरूस्ती करिता रविंद्र गवई यांनी सहकार्य केले













