जळगाव पोलीस स्टेशनला गुहा दाखल.
जळगांव जामोद,दि.२०(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
सोन्याच्या गींन्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून बाळापुर तालुक्यातील इसमांना दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.१८ रोजी तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली.याबाबत बाळापुर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील फिर्यादी सुनील चंद्रभान तायडे यांनी दि. १९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत भोसले व इतर दोन अश्या एकूण तीन आरोपींनी फिर्यादी सुनील तायडे यांना कमी पैशात सोन्याच्या गिंन्या
देतो असे सांगून सोन्याच्या गिंन्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आरोपीचे साथीदार पैकी एका महिलेने घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या दिसणाऱ्या गिन्न्या सुनील तायडे व त्यांच्या मित्राला दाखवल्या.सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याच्या अटीवर प्रथम पैसे द्या नंतर सोने देतो असे सांगून सुनील तायडे ने दोन लाख रुपये सोन्याच्या गिन्न्याच्या बदल्यात आरोपीं जवळ पैसे दिले.पैसे दिल्यानंतर सोन्याच्या गिंन्या मगीतल्या असता दिल्या नाहीत.यादरम्यान दोन मोबाईल फोन सह नगदी दोन लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले.
फसवणूक केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी भारत भोसले व इतर दोन यांच्या विरुद्ध अप,क्रमांक ९६/२५ नुसार कलम ३१८,(४) ३ (५) बी,एन,एस अन्वये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत.













