जळगांव जामोद,दि.२१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
स्थानिक बस स्थानक ते दि न्यू इरा हायस्कूल दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बांधण्यात येणाऱ्या स्काय वॉक चे बांधकाम डोकेदुखी ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तहसील परिसरात शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते.तहसील व इतर कार्यालये याच भागात असल्याने तालुक्यातील नागरिकांचीही गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बस स्थानक ते दि न्यू इरा हायस्कूल दरम्यान सुमारे १० कोटी रुपये खर्च करून स्काय वॉक चे बांधकाम करण्यात येत आहे.स्काय वॉक चे बांधकाम मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. खोदकामानंतर रस्त्यावर पडलेल्या मातीमूळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूळ उडत आहे.या धुळीमुले विध्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास होत असून पुरते हैराण झाले आहेत.खोदकामातून निघालेले माती,दगड पूर्णपणे स्वच्छ करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे जेणेकरून वाहतुकीस अडथडा निर्माण होणार नाही.
जलवाहिनी आहे बांधकामात अडसर:-
जळगांव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या १४० गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी तहसील व बसस्थानक परिसरातुन गेलेली आहे तर याच भागातून स्काय वॉकचही बांधकाम सुरू आहे मात्र हीच जलवाहिनी बांधकामाच्या मधात येत असल्याने अडसर ठरत आहे.जलवाहिनीचे स्थानांतरणही शक्य नसल्याने यातून कसा मार्ग काढायचा ? हा यक्ष प्रश्न अभियंत्यांसमोर उभा ठाकला आहे.
Add Comment