जळगांव जामोद बुलढाणा बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील तीन जेष्ठ पत्रकार पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. 

Spread the love

संग्रामपूर,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांचा  दि १६  फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे सन्मान करण्यात आला.या मध्ये संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, केशवराव घाटे,आणि वासुदेवराव दामधर या तिघांना पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदच्या वतीने जिल्ह्यातील ६० वर्षावरील जेष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांचा पत्रयोगी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष रणजित राजपूत व त्याची टीम सह संग्रामपूर चे जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे,तालुका अध्यक्ष  ज्ञानेश्वर दांदळे,डाॕ.संतोष लांडे,श्याम देशमुख,राजूभाऊ धर्माधिकारी,शेख रफीक शेख पन्ना,निलेश तायडे,मोहन सोनोने,स्वप्नील देशमुख,शेख अब्दुल भाई,आदी पत्रकार तथा इतर पदाधिकारी,तसेच सौ.कुसुम गायकी, सौ.शोभा दामधर ,राज्य,विदर्भ व जिल्हा तसेच १३ ही तालुक्यातील अध्यक्ष, सचिव व विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!