Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.   

Spread the love

पंचायत समिती शिक्षण विभागाचे आयोजन.

जळगाव जामोद,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

आधुनिक काळात फास्ट फूड पासून दूर राहून तृणधान्यापासून बनवलेल्या घरातील पदार्थांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा याकरिता शिक्षण विभाग पंचायत समितीने दि.१८  फेब्रुवारीला शहरातील दी. न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य  वर्षा अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी सहभागी होऊन तृणधान्यापासून बनवलेले विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन दी. न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, जावरकर   विस्तार अधिकारी पंचायत समिती , अविनाश कुलकर्णी प्राचार्य दि. न्यू .इरा कनिष्ठ महाविद्याल, दीपक पसरटे शालेय पोषण आहार अधीक्षक, सुहास वाघमारे मार्गदर्शक, महादेव कुवारे केंद्रप्रमुख आसलगाव,अनंत वाडसे सहाय्यक शिक्षण, अनंता काटोले,सचिन जोरवार, सहाय्यक शिक्षक, मीना वाकोडे, दिपाली मोरे व आरती कुबेर परीक्षक, गणेश व्यवहारे मुख्याध्यापक, पुष्पा कसूरकार मुख्याध्यापक, नाजिम सर मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा पूजनाने झाली. या स्पर्धेच्या आयोजनाबाबतचे प्रास्ताविक शालेय पोषण आहार अधीक्षक दीपक पसरटे यांनी केले. स्पर्धेचे मार्गदर्शक सुहास वाघमारे यांनी पोषणात तृणधान्याचे महत्त्व व मानवी शरीराला तृणधान्यापासून मिळणारी विविध पोषण तत्वे यावर सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक पिढीला फास्ट फूड सोडून तृणधान्यापासून बनवलेले विविध पदार्थ पालकांनी दिले पाहिजे असे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात  तृणधान्याचे उपलब्ध विविध प्रकार व त्यांचा पारंपारिक उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.अविनाश कुलकर्णी प्राचार्य दि‌. न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालय यांनी या पाककृती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आणलेले तृणधान्यापासून निर्मित विविध खाद्यपदार्थ परीक्षण परीक्षकांनी केले. त्यामधून प्रथम क्रमांक  कु.अक्षरा प्रमोद देशमुख दि. न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद पाच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक कु.सुरुची मधुकर वाघ जि. प .म .शाळा काजेगाव तीन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक कु.शिवानी गाडेकर व कु.मुक्ता थूटे जनता विद्यालय जामोद यांना दोन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र या पुरस्काराचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय पोषण आहार अधीक्षक दीपक पसरटे यांनी त्यांच्याकडून उत्तेजनार्थ सौ. जयश्री विलास केदार पि .एम. श्री हायस्कूल जळगाव जामोद  यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीस पाचशे रूपये दिले. ही तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.                       

#तृणधान्यापासून बनवलेले  शेकडो पदार्थ लक्षवेधक# 

ज्वारी ,मका ,गहू ,बाजरी आदी तृणधान्यापासून बनवलेले बिस्कीट, केक, पेस्ट्री , खीर ,सुप, कुरकुरे, मिठाई ,गुलाब जामुन आदि शेकडो खाद्यपदार्थ लक्षवेधक ठरले. तृणधान्यापासून एवढे पोषक पदार्थ आपण आपल्या युवा पिढीला देऊ शकतो व त्यांना फास्ट फूड खाण्यापासून रोखू शकतो असा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थितांना मिळाला. या स्पर्धेतील लक्षवेधक खाद्यपदार्थांची चर्चा होत आहे.

नव्या पिढीला  घरी तृणधान्यापासून बनवलेले पोषक पदार्थ  खाण्याची सवय लागावी तसेच विविध आजार करणारे फास्ट फूड  सोडून  आपले आरोग्य सांभाळावे हा प्रमुख संदेश देण्यासाठी या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते

(दीपक पसरटे, शालेय पोषण आहार अधीक्षक जळगाव जामोद.)

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!