जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

येनगाव ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता.

Spread the love

जळगाव जामोद,दि.८ समर्थ भारत मराठी :

येनगाव बस थांबा ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करण्याच्या मागणी करिता ग्रामस्थांचे बस थांब्यावर उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणाची बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार सांगता झाली.

तालुक्यातील येनगाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता बस थांब्यावर उपोषण सुरू केले.याबाबत उपोषणा पूर्वी अरविंद जानराव वायझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव जामोद व जिल्हा परिषद बुलडाणा यांना निवेदन सादर केले होते मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने अरविंद वायझोडे यांना उपोषणास बसावे लागले आहे. सदर उपोषणास गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला व बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक,अशोक मुरुख, सुहास वाघ, आदित्य प्रसेनजीत पाटिल, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे,युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, शिवसेनेचे अमोल दाभाड़े यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!