बस थांबा ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा : ग्रामस्थांची मागणी.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगाव जा तालुक्यातील येनगाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता बस थांब्यावर उपोषण सुरू केले आहे.उपोषण पूर्वी गावातील अरविंद जानराव वायझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव जामोद व जिल्हा परिषद विभाग बुलडाणा यांना उपोषणाबाबत निवेदन सादर केले होते.
निवेदनात येनगाव येथील बस थांब्यापासून गावापर्यंत गेल्या १३ वर्षापासून रस्ता झालेला नाही.त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन सादर केले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची शासनस्तरावर कारवाई झाली नाही. रस्ता तात्काळ बांधकाम करा अन्यथा,लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता असे असताना प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने अरविंद वायझोडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.
उपोषणास गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. तसेच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, आदित्य प्रसेनजीत पाटिल, सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
Add Comment