political party जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

विविध समस्यांसाठी समाजवादी पार्टीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

Spread the love

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी समाजवादी पार्टी च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव जामोद शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेने या रस्त्याचे नवीन बांधकाम करावे, डॉ.शेख यांच्या घरापासून राजा भर्तृहरिनाथ मंदिरापर्यंत तसेच सईद पैलवान यांच्या घरापासून ते वायलीवेस पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे,  प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये घाण कचरा अडकून पडल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन करून नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, या परिसरात नवीन नाली बांधकाम करून महात्मा फुले शाळेजवळील नाल्यांमधील साचलेली घाण काढण्यात यावी या मागण्या समाजवादी पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकतखान, समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस,तालुकाध्यक्ष मुश्ताक जमदार, जिल्हा संपर्कप्रमुख अब्दुल साबीर, गुड्डू मौलाना, आरिफ डीजे, सय्यद कमर, शेख शरीफ, शेख मजहर यांच्यासह समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!