Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

चित्रकला परीक्षेत दि.न्यू ईरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

Spread the love

जळगांव जामोद,दि.८ (प्रतिनिधी) समर्थ भारत मराठी:

महाराष्ट्र राज्य कला संचनालय मुबई द्वारा आयोजित करण्यात आलेल्या शासकीय चित्रकला स्पर्धेत स्थानिक दि न्यु इरा हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य कला संचलनालय मुंबई द्वारा आयोजित  शास‌कीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरीचा निकाल १०० टक्के तर द्वितीय परीक्षा इंटरमिजीएट् निकाल ९५ टक्के लागला आहे. यामध्ये १५ विध्यार्थ्यांना ‘अ’ दर्जा मध्ये तर २२ विद्यार्थी ‘ब’ दर्जामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेला एकूण ५३ विद्यार्थी बसले होते तर इंटरमिजीएट परीक्षेला ४० विद्यार्थी बसले होते. एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेत कु.प्राची अशोक अस्वार,कु मृणाल वसंत अंबडकार, कु. उत्कर्षा प्रीतमसिंह ठाकुर,शार्दुल अनिल भगत, कु अनन्या राजेंद्र भगत, श्रुती सखाराम डावर, कु.श्रावणी राजेश मिसाळ, कु.रेणुका श्रीकृष्ण माटे, कु.भक्ती श्रीराम निमरकर्डे, कु. उन्नती विनोद पिंजरकर, कु रेणु तुकाराम रंदाळे, कु.सृष्टी संतोष सातव,प्रसाद श्रीकात उमाळे, कु.पायल सुनिल वंडाळे, कु.दिशा दिनेश येउल या विध्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य अविनाश कुळकर्णी, उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकार तायडे व कलाशिक्षक रविंद्र गावंडे यांनी अभिनंदन केले आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!