Editor Choice Front Maharashtra political party Politics जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

मायबाप जनतेला समर्पित “संसदपटू” पुरस्कार!..आ.डॉ.संजय कुटे.

Spread the love

आ. डॉ. संजय कुटे उत्कृष्ट संसद पटू पुरस्काराने सन्मानित.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना नुकताच उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण विधिमंडळात करण्यात आले.

आ डॉ संजय कुटे हे गेल्या २० वर्षा पासून विधिमंडळामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतीनिधित्व करीत आहेत. विधिमंडळात त्यांची उपस्थिती १००% राहिली आहे.संसदीय कार्य मत्र्यांसोबत राहून फ्लोअर मैनेजमेंट करणे, मंत्री असताना जबाबदारी असलेल्या खात्यात जनतेकरीता न्याय देत काम करणे, राज्यातील व मतदारसंघातील समस्यांची अतिशय सखोल अभ्यासातून सभागृहात मांडनी करणे,सभागृहात प्रतोद पदावर काम करणे तसेच  विधिमंडळाच्या विविध समितींवर प्रमुख पद भूषवित जबाबदारिने काम अशा विविध महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी आ.डॉ. संजय कुटे यांनी सांभाळली आहे. या सर्व बाबी लक्षात घेत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ संजय कुटे यांना सन २०१८-२०१९ चा “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार भारताच्या महामाहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते विधिमंडळ मुंबई येथे प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांचे सोबत त्यांच्या आई उर्मिलाताई कुटे व पत्नी डॉ.अपर्णा कुटे ह्या देखील उपस्थित होत्या.

  “माझ्या जीवनातील हा अतिशय आनंदाचा क्षण असुन हा पुरस्कार माझे जन्मदाते माझे आई वडील आणि माझ्या मतदारसंघतील मायबाप जनतेला मी समर्पित करतो”

….आ. डॉ.संजय कुटे

error: Content is protected !!