Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

लाडक्या बहिनींसाठी आ.डॉ संजय कुटे यांनी सुरु केले मदत केंद्र!

Spread the love

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
राज्यातील भगिनींसाठी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत घोषित करुन राज्यशासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे.या योजनेसाठी लागणाऱ्या कागद पत्रांची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जळगांव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी मतदारसंघात मदत केंद्र सुरू केले आहे.या मदत केंद्रामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे महिलांनी एकच लगबाग सुरू केली होती आणि एकाच वेळी हजारों महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळवाजुळव करण्यासाठी बाहेर पड़ल्या त्यामुळे तलाठी कार्यालय,झेराक्स केंद्र,सेतु केंद्र,तहसील कार्यालय येथे प्रचंड गर्दी उसळली होती.याचा फायदा घेत महिलांची लुबाडनणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले होते.
महिलांच्या ह्या समस्यांची आ.डॉ संजय कुटे यांना माहिती मिळताच मतदारसंघात आवश्यक त्या ठिकाणी मदत केंद्र तातडिने सुरू करण्याच्या सुचना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केल्या.मदतकेंद्राच्या ठिकाणी योजनेकरीता लागणारे फॉर्म आणि स्वयंम घोषणा पत्र मोफत उपलब्ध करून दिले तसेच योजने बद्दल माहिती देत आवश्यक त्या महिलांचे फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. ३ जुलै रोजी स्थानिक तहसील कार्यालयावर सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिलांनी भेट देत आपले फॉर्म योग्यरित्या भरून घेतले.आज तीसऱ्या दिवशी पर्यन्त ५ हजारांहून अधिक महिलांनी आपली कागदपत्रे सादर करीत फॉर्म भरून घेतले.आ डॉ. संजय कुटे यांच्या कल्पकतेतुन सुरू केलेल्या कर्तव्य मदत केंद्रामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जामोद येथील मदत केंद्रावर अशोक नानकदे, कैलास पाटिल,पांडुरंग मीसाळ,नितिन ढगे,रवी पाचपोर, एकनाथ वनारे,राजेंद्र गांधी,आशीष सारसर,विजय तिवारी,शाकिर खान,खालिक टेलर,संतोष देशमुख,गौरव डोबे,खुपसे सर,योगेश धर्मे,उमेश येऊल,शैलेश बोराड़े, करणसींग राजपूत,गजानन देशमुख,मनोज देशपांडे,पंकज कड़,अनिल ढगे व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

येथे सुरू आहेत मदत केंद्र :- तहसील कार्यालय जळगाव जामोद,तहसील कार्यालय शेगांव, तहसील कार्यालय संग्रामपुर यासह वानखेड़,सोनाळा, बावनबीर,वरवट बकाल,पातुर्डा,टुनकी या ठिकाणी हे कर्तव्य मदत केंद्र सुरु करण्यात आले असुन हजारों महिलांनी भेट देत आपले अर्ज व्यवस्थित भरून घेतले आहेत.

भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित कर्तव्य मदत केंद्र येथे जाऊन महिलांनी मार्गदर्शन घेत आपले अर्ज भरून घ्यावे आणि नंतर ऑनलाइन करून घ्यावे. सदर योजने करीता फ़क्त कागदपत्रांची गरज असुन कोणताही खर्च नाही. कोणताहि व्यक्ति पैश्याची मागणी करत असेल तर त्याची तक्रार बहिणींनी माझ्याकड़े करावी……आ. डॉ. संजय कुटे

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!