Health & Fitness जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा.

Spread the love

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

3 जुन हा दिवस सर्वत्र जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो.याचेच औचित्य साधून जळगाव जामोद सायकल ग्रुप च्या वतीने जळगाव जामोद शहरात सायकल रॅली काढून व नागरिकांमध्ये सायकल चालवल्याने आरोग्य विषयक फायदे याची जनजागृती करून साजरा करण्यात आला.

जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या ५० सदस्यांनी शहरातील मध्यवर्ती भागातून जनजागृती करत सायकल रॅली काढली. आजच्या रॅली मध्ये विशेष करून जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार महाजन तसेच जळगाव जामोद वनविभाग चे रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर नीलेश काळे सहभागी झाले.

दैनंदिन जीवनात सध्या सायकल चा वापर कमी होत आहे. मात्र नियमित सायकलिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते व रक्तदाब नियमित राहतो.रोज किमान २५-३० मिनिटे सायकलिंग केल्याने हैप्पी हार्मोन्स सक्रिय होतात त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते.त्यामुळे सर्वांनी  स्वतः साठी स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून किमान २५-३० मिनिटे तरी सायकलिंग करावे असे आवाहन जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने शहर वासियांना करण्यात आले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!