बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

दुसरबीड येथील जप्त केलेला रेतीसाठा घरकुल धारकांना विनाशुल्क वाटप.

Spread the love

दुसरबीड प्रतिनिधी | समर्थ भारत मराठी :

सिंदखेडराजाचे तहसीलदार प्रविण धानोरकर यांना दुसरबीड येथे दि.१० मे रोजी ३० ब्रास अवैद्यरेती साठा  दिसून आला. सदर रेतीसाठा जप्त केल्यानंतर सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे सांगितले. त्यानुसार दुसरबीड ग्रामपंचायतने दिलेल्या १९ लाभार्थ्यांच्या यादीपैकी १० लाभार्थ्यांना फक्त वाहतूक खर्च घेऊन इतर कोणतेही शुल्क न आकारता मोफत रेतीचे वाटप करण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की,  दि.१० मे रोजी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी डॉ.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रवीण धानोरकर, बिडीओ श्रीकृष्ण वेणीकर, तलाठी राहुल देशमुख, पोलीस शिपाई सलीम परसुवाले, असलम नवरंगबादी यांना संयुक्तपणे येथील वार्ड क्रमांक २ च्या पाठीमागे असलेल्या शेतातील एका घराला लागुनच अवैध रेतीसाठा दिसुन आला. यावरून महसूलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अंदाजे ३० ब्रास रेती जप्त केली. दरम्यान पंचनामा करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरबीड घरकुल लाभार्थ्यांना केवळ वाहतूक खर्च घेत इतर कोणतेही शुल्क न घेता मोफत रेतीचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली.लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत रेती मिळाल्याने  आनंद व्यक्त होत आहे. 

उर्वरित ९ घरकुल लाभार्थी मोफत रेतीच्या प्रतिक्षेत 

तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी दिलेल्या माहितीवरून जप्त केलेल्या ३० ब्रास रेती मधुन ग्रामपंचायत ने दिलेल्या यादीतील १९ पैकी १० लाभार्थ्यांना प्रत्येकी २ ब्रासप्रमाणे तात्काळ मोफत रेतीचे वाटप करण्यात आले. परंतू उर्वरित ९ घरकुल लाभार्थ्यांना मात्र रेती केव्हा मिळेल? या प्रतीक्षेत आहेत.

error: Content is protected !!