शेगांवची प्रांजली कंझारकर मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत.
शेगांव | समर्थ भारत मराठी :
अक्षय तृतीयेच्या शुभपर्वावर मनोमनी हा मराठी चित्रपट सांगली येथुन प्रर्दशित करण्यात आला आहे.हा चित्रपट महाराष्ट्रातील विविध चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये शेगांवची प्रांजली कंझारकर मुख्य अभिनेत्रीची भुमिका बजावित आहे.जिल्ह्यासाठी ही बाब गौरवास्पद आहे.
या चित्रपटामध्ये प्राजंली कंझारकर, रोहित परशुराम ( अप्पी आमची कलेक्टर -झी मराठी सिरीयल फेम) सुप्रिती शिवळकर, मिलींद जाधव, संजय देवकर, चैत्राली जाधव आदी कलाकार प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शेगांव येथे वास्तव्यास असलेल्या प्राजंली कंझारकर चा अभिनय नक्कीच शेगांवकरांकरीता अभिमानास्पद बाब आहे.शेगांव शहर परिसरात लहानाची मोठी झालेली प्रांजलीला सुरुवातीपासून सिने क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणासोबतच तिची ओढ सिनेजगताकडे होती.तिचा मनोमनी हा चित्रपट दि.१० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रर्दशित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे सांगली येथे करण्यात आले आहे.
के.ए.फिल्म अँड एंटरटेनमेंट च्या वतीने “मनोमनी” चित्रपटाची निर्मीती करण्यात आली असुन मुख्य निर्माते अविनाश कोगनोळे, सहनिर्माते वर्धन चौगुले, तर दिग्दर्शक संजय देवकर, छायांकन जयसिंग राजपुरोहित यांनी प्रमुख कार्यभार पार पाडला आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा निर्माते अविनाश कोगनाळे यांची असून चित्रपटाचे संगीतकार राहुल घाेरपडे व वेशभूषेकरीता सतीश सांडभोर यांनी काम पाहिले आहे.
प्राजंली कंझारकरने वेगवेगळ्या चित्रपटामध्ये अभिनयाची भुमिका पार पाडली आहे. त्यामध्ये बबन, एकदम कडक तसेच डॉली या तेलगु चित्रपटामध्येही तिने काम केलेले आहे.शेगांव येथील प्रांजली कंझारकरचा “मनोमनी” चित्रपट महाराष्ट्रात प्रर्दशित झाला असल्याने याबद्दल शेगांवकरांना स्वार्थ अभिमान आहे. तिने तिच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये उत्तुंग भरारी घ्यावी अशी मनोकामना शेगांव करांकडून व्यक्त होत आहे.
Add Comment