बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

समृद्धी महामार्गावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली.  

Spread the love

दोन जागीच ठार, चार जण गंभीर जखमी.

दुसरबीड | समर्थ भारत मराठी :

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना. महामार्ग रस्ते विकास महामंडळाकडून दररोज अपघात रोखण्यासाठी नवनवीन पर्याय समोर आणले जात असले तरी अपघातांची मालिका रोखण्यात महामार्ग प्रशासन कमी पडत असल्याचे समोर येत आहे. नागपूर येथून दुसरबीड मार्गे पुणे जात असताना समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॅरिडोअरवर एमजी हेक्टर कंपनीच्या एम.एच १२ आर.एक्स ००७० च्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारमधुन प्रवास करत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना  सकाळी ९ वाजताच्या सुमारास किनगावराजा समोर चैनल नंबर ३२८.८ वर घडली.

मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेले सहा जण एमजी हेक्टर कार क्रमांक एम.एच १२ आर.एक्स ००७० ने नागपूर येथून पुणे जात असताना कार चालकाचे कार भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून व कार अनियंत्रीत झाल्याने पलटी झाली. या कारमध्ये एकुण सहा जण होते . त्यापैकी मुकेश कुमार वय २५ वर्षे व रवी कुमार वय ३० वर्षे दोघे राहणार मध्यप्रदेश हे जागीच ठार झाले. तर कार चालक तब्रेज निहालजी वय २५ वर्षे, संजय पाचार वय २७ वर्षे, राजेश कुमार वय २८ वर्षे, संजय कुमार वय ३० वर्षे सर्व  राहणार मध्यप्रदेश हे चौघे गंभीर जखमी झाले आहे.जखमींवर ग्रामीण रूग्णालय सिंदखेडराजा येथे प्रथमोपचार सुरू आहेत.

यावेळी सुरक्षा रक्षक भगवान गायकवाड, अजम पाटील, शरद वायाळ, गोरख पालवे, नयन बोर्डे, राहूल पवार,  हनुमान जायभाये, अक्षय बावने, विष्णु घुगे, प्रदीप श्रीरामे, विघ्ने, विलास काकड, आकाश मुंगडे, वैभव बर्डे, आनंद गोरे यांच्या पथकाने तातडीने मदत कार्य केले.

error: Content is protected !!