बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

किनगावराजा जवळ ट्रकची टिप्परला समोरून जोरदार धडक.

Spread the love

दुसरबीड | समर्थ भारत मराठी:

सिंदखेडराजा ते दुसरबीड राज्यमहामार्गावर किनगावराजाकडे गिट्टी घेऊन जाणाऱ्या टिप्परला विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात टिप्पर चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक ही गंभीर जखमी झाला आहे. हि घटना दि ५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

टिप्पर क्रमांक एम.एच २८ बी.बी १४३१ दुसरबीडहून किनगावराजाकडे गिट्टी वाहतूक करताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच ४६ ए.एफ ६७७५ चे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून टिप्परला जोरदार धडक दिली.यामध्ये टिप्पर चालक प्रविण भीमराव मुळे वय ३० वर्षे रा.खंडाळा ता.लोणार हा जागीच ठार झाला. मेहकर येथील कत्राटदार बाळकृष्ण एकनाथ काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक पुंजाराम श्रावण कोसरे रा.पोरगव्हाण ता.आष्ठी, जि.धुळे यांचे विरूद्ध किनगावराजा पोलीसांनी कलम २७९, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!