जळगाव जामोद मतदारसंघाला मिळाला प्रथमच हा बहूमान.
जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
राज्यातील दोन टप्पातील निवडणुका पार पडल्या असुन इतर भागात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. सर्वसाधारण लोकसभा निवडणूक २०२४ करीता राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी च्या वतीने शेड्यूल – ५ प्रमाणे स्टार कैंपेनर ची यादी निवडणूक आयोगाकड़े दिनांक १ मे रोजी दिली आहे त्यामध्ये माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांचा समावेश करण्यात आला आहे.
जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत ४ वेळा निवडुन आलेले लोकप्रिय आमदार तथा माज़ी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पूढील पाच टप्पातील निवडणुकांसाठी स्टार कैंपेनर म्हनुन नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहें तसे पत्र भाजपा चे राष्ट्रीय सरचिटनीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहें. सदर यादि मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ,देवेंद्र फडणवीस यांचे सह देशभरातील आणि महाराष्ट्रातील ४० बड्या नेत्यांचा समावेश आहे.त्यात बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
रावेर लोकसभा क्षेत्राच्या निरीक्षकपदी आ.डॉ.कुटे यांची नियुक्ती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.३ में रोज़ी एक प्रसिद्ध पत्रक काढ़ून लोकसभा निवड़नुक़२०२४ मधे चौथ्या टप्पातील रावेर लोकसभा करीता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माज़ी मंत्री डॉ संजय कुटे यांची निरीक्षक पदी नियुक्ती केली आहें.
Add Comment