जळगांव जा.मतदारसंघाला होणार फायदा : आ.डॉ.संजय कुटे यांची माहिती.
जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सौर वाहिनी अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील सहा ठिकाणी,संग्रामपूर तालुक्यातील सात ठिकाणी,शेगाव तालुक्यात एका ठिकाणी अशा एकूण १४ ठिकाणी सौर उर्जेवर निर्माण होणाऱ्या वीज प्रकल्पास मान्यता मिळाली असून याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज उपलब्ध होणार असून मतदारसंघात सिंचनासाठी त्याचा मोठा फायदा सुद्धा होणार आहे.
गत एक वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव जामोद मतदारसंघात मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना अंतर्गत सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आ.डॉ.संजय कुटे यांचा पाठपुरावा सुरू होता त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर १४ प्रकल्पास मान्यता देऊन मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी,संग्रामपूर तालुक्यातील वसाडी,पातुर्डा, काकणवाडा,सायखेड-पिंगळी तर जळगाव तालुक्यातील भेंडवळ खुर्द, वायाळ, कुवरदेव, धानोरा महासिद्ध,मोहीदेपूर आणि करमोडा अशा एकूण १४ ठिकाणी हे वीज निर्मिती प्रकल्प उभे राहणार आहेत.
आ.डॉ.संजय कुटे यांच्या या विशेष प्रयत्नामुळे सदर १४ प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विजेच्या बाबतीत मतदरसंघ स्वयंपूर्ण होणार असून शेतकऱ्यांना दिवसा आणि सलग आठ तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रात्री-बेरात्री होणारे हाल थांबणार आहेत तसेच सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी कमी दरात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सुद्धा होणारा आहे असे डॉ. कुटे यांनी सांगितले.
Add Comment