जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार जल योद्धा, कर्मयोद्धा डॉ.संजय कुटे यांचा वाढदिवस ९ मार्च रोजी विविध समाजपयोगी कार्यक्रम करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आमदार संजय कुटे यांच्या “तृप्ती व्हिला” या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थिती दिसून आली. वाढदिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.डॉ.हेगडेवार रक्तपेढी अकोला यांच्या रमेश देशपांडे,अविनाश कवर,युवराज खोडके,संतोष अंधारे,संदीप नरकाळे,कविता इंगळे यांनी परिश्रम घेतले तर ६० रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आ. डॉ. संजय कुटे यांनी आभार मानले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
बोराळा येथील बँड वादक व जळगाव जामोद येथील बँड वादक पथकाने स्वयंस्पुर्तीने उपस्थित राहून डॉ.कुटेचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.

शासनातर्फे मिळालेल्या टँबचे अंगणवाडी सेविकांना आमदार डॉ.कुटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धनंजय देशमुख यांनी पूरग्रस्त नागरीकांना मदत व्हावी या उद्देशाने आ.डॉ.संजय कुटे यांच्या वाढदिवसांनिमित्त ५० हजार रुपयांची धनराशी स्व. श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनला प्रदान केली.
मागील दोन वर्षांपासून आ.डॉ. संजय कुटे वाढदिवशी मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांचा वाढदिवस चाहत्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देता आल्या नाही.त्यामुळे यावर्षी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून मोठ्या उत्साहात आमदारांचा वाढदिवस साजरा केला.













