पश्चिम बंगाल मधील महिला अत्याचारा विरोधात दिले निवेदन.
जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच ज्येष्ठ नेत्याने शेकडो महिलांवर अत्याचार केले तरीसुद्धा दोन महिन्यानंतरही त्याला अटक केली नाही या विरोधात संतप्त होऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने ममता बॅनर्जी यांचे विरोधात तीव्र निदर्शने केली व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर धर्मजागरण आणि भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निदर्शने आंदोलने करण्यात आले.पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत.तेथे गुंडाराज आहेच त्यासोबत महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे मोठे नेते शहाजान शेख यांनी संदेशखाली या गावात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले.त्यांच्या विरोधात १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असूनही सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर पोलिसांना त्याला अटक केली.महिला मुख्यमंत्री असतांना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच जवळच्या नेत्याने महिलांवर एवढ्या प्रमाणात अत्याचार केला असतांना सुद्धा त्याला पाठीशी घालत आहेत हे एका महिला मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.या गंभीर प्रकरणाचा तीव्र निषेध आज भाजपा महिला आघाडी जळगांव जामोद आणि धर्मजागरण च्या वतीने करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चा शहर अध्यक्ष सुनिता म्हसाळ ,सुजाता बंबटकार – खामगाव जिल्हा सहसंयोजिका धर्मजागरण समन्वयक,निता वानखडे, शारदा फंदाळे,दिपाली मलटे, सुवर्णा कवळकार,कल्याणी खंडारे,उषा कतोरे,वर्षा फंदाळे, मनिषा मेनकर यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच राष्ट्रसेविका संघाच्या पदाधिकारी यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला व भाजपा महिला आघाडीच्या समवेत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.













