दुसरबीड | समर्थ भारत मराठी :
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हना येथील अंगणवाडीतील बालकांना आनंददायी व बौद्धिक शिक्षण मिळावे म्हणून ग्रामसेवक विनोद सातपुते यांनी अंगणवाडीच्या भिंतीवर उजळणी,फळांचे चित्र,प्राण्यांचे चित्र,भाजीपाल्याचे चित्र, घोषवाक्य,म्हणी,लहान बालकांचे चित्र काढून भिंती बोलक्या केल्या आहेत.
आज पूर्व प्राथमिक शिक्षणाची शासकीय सुविधा म्हणून एकात्मिक बालविकास प्रकल्प या शासनाच्या महत्त्वाच्या विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी केंद्राकडे बघीतले जाते.कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या इथे जास्त दिसून येते.
अंगणवाडीतील बालकांना हसत खेळत शिक्षण मिळावे म्हणून अंगणवाडीच्या भिंती बोलक्या केल्यामुळे अंगणवाडी सेविकांना बालकांना शिकविण्यासाठी मदत होत आहे. अंगणवाडी बोलकी करण्यासाठी ग्रामसेवक विनोद सातपुते,सरपंच शशिकला भोसले,उपसरपंच शिवगंगा जायभाये,शिवराज कायंदे,अंगणवाडी सेविका अर्चना आघाव यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले.













