बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

दुसरबीड महसूल मंडळाला गारपिटीचा तडाखा.

Spread the love

दुसरबीड | समर्थ भारत मराठी :

दुसरबीड महसूल मंडळात अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व गारपिटीच्या तडाख्यामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

दुसरबीड महसूल मंडळातील राहेरी खुर्द,राहेरी बुद्रुक, बारलिंगा,तढेगाव,केशवशिवणी,जऊळका,मलकापुर पांग्रा,विरपांग्रा येथे तुरळक प्रमाणात तर दुसरबीड परिसरात तब्बल २० मिनिटे तुफान वारा व विजांसह गारपीट झाली. यामुळे दुसरबीड महसूल मंडळातील गहू, हरभरा, शाळु, कांद्यासह शेडनेट मधील इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

आज संध्याकाळी ७ वाजता पासुनच दुसरबीड महसुल मंडळात ढगाळ वातावरण होते.सव्वा आठच्या सुमारास दुसरबीड मध्ये वादळी वारा व विजांचा गडगडाट सुरू झाला. यानंतर लगेच मुसळधार पावसात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली.यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून यापूर्वीच्या अतिवृष्टी व पिक विम्यापासूनच शेतकरी वंचित आहे.आता या गारपिटीने झालेल्या नुकसानीची आणखीन त्यात भर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!